
विद्येच्या प्रांगणात स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण
सेंट ॲन्स स्कूल
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात निगडी येथील सेंट अॅन्स पूर्व प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये, गीत-गायन व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख पाहुणे विंग कमांडर पी. व्ही. सी पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया चव्हाण पाटील, प्रा. डी. आर. करनुरे, डॉ. भरत चव्हाण पाटील, श्वेता चव्हाण पाटील, सेंट ॲन्स पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती शिंदे, विद्यानंद भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जया श्रीनिवास आदी उपस्थित होते. पर्यवेक्षिका रश्मी नायर व सुमन सरिन यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका शिंदे यांनी अहवाल सादर केला.
एच. ए. स्कूल प्राथमिक विभाग
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल प्राथमिक विभागात शिक्षक पालक संघातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष भिकाजी पाटील व सर्व कार्यकारिणीचे सदस्य कार्यक्रमास उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे डॉ. विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.
हळदी कुंकवासाठी सर्व माता पालक, शिक्षिका उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांनी प्रास्ताविक केले.
एच. ए.स्कूल माध्यमिक विभाग
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलमध्ये हस्तलिखित प्रकाशन, नियतकालिक प्रकाशन नवोपक्रम राबविला. यावेळी एच. ए. कंपनीच्या प्रमुख निबंधक नीरजा सराफ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी केले. पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख विजयालक्ष्मी हाके यांनी आभार मानले.
विद्यानंद भवन हायस्कूल
निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूल उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धेतील विजयी पालकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत चव्हाण पाटील, संस्थेच्या विश्वस्त श्वेता चव्हाण पाटील, सेंन्ट ॲन्स् पूर्व-प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रीती शिंदे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जया श्रीनिवास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका अर्चना बानवळी क्रीडाशिक्षक सरोजा सूर्यवंशी, शीतल म्हात्रे, साहेबराव जाधव व अनुपम आल्हाट यांनी केले. आर्या कुंभार हिने आभार मानले.
सरस्वती विश्वविद्यालय नॅशनल स्कूल
तळवडे येथील सरस्वती विश्वविद्यालय नॅशनल स्कूलमध्ये शाळेच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी शिस्तशीर संचलन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर उपस्थित होते. शाळेचे संस्थापक विश्वनाथन नायर यांनी मार्गदर्शन केले. युधिष्ठिर, कर्ण, भीम आणि अर्जुन संघाच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील संस्कृतीचे दर्शन नृत्यातून घडविले.
इंडस बिझनेस स्कूल
वाकड येथील आय.आय.ई.बी.एम, इंडस बिझनेस स्कूल आणि इंडस चाम्पस स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्हॉइस ॲडमिरल दिनेश देशपांडे हे उपस्थित होते. आय.ई.बी.एमचे अध्यक्ष कर्नल (नि.) विनोद मारवाह, व्यवस्थापकीय संचालक डॉ. जयसिंग मारवाह, अधिष्ठाता डॉ. पूनम, निकम, सह अधिष्ठाता डॉ. भारती कालिया, डॉ. विशाल भोळे, बापू पवार सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विजयरन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले.
भारतीय जैन संघटना विद्यालय
भारतीय जैन संघटना विद्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विद्यालयातील माजी विद्यार्थी नायब सुभेदार सचिन आठरे पाटील आणि भारतीय जैन संघटना ज्येष्ठ सदस्य सुभाष ललवाणी, भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष वीरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शुभम कटारिया, सचिव अतुल बोरा, सहसचिव नयन शहा, तेजस कटारिया माजी नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेविका सुलक्षणा धर, विद्यालयाचे प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय जाधव, माजी विद्यार्थी जमीर सय्यद, अरविंद भोसले, रोहित मपवार उपस्थित होते. अनुजा गडगे यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले. वामन भरगंडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय जाधव यांनी आभार मानले.
सीएमएस सेकंडरी हायस्कूल
निगडी येथील चिंचवड मल्याळी समाजम संचलित (सीएमएस) इंग्लिश मीडियम सेकंडरी हायस्कूलच्यावतीने आयोजित केलेल्या स्नेह संमेलन पार पडले. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, सीएमएस इंग्लिश मिडियम हायस्कूलचे अध्यक्ष टी. पी विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, माजी अध्यक्ष पी.व्ही भास्करन, उपाध्यक्ष पी श्रीनिवासन, खजिनदार पी. अजयकुमार, सांस्कृतिक समिती प्रमुख जी. करुणाकरन, महिला प्रमुख प्रविजा विनीत,उच्च माध्यमिकच्या मुख्याध्यापिका बिजी गोपकुमार, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषण अध्यक्ष टी. पी. विजयन यांनी केले. मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सोफिया मार्गरेट यांनी आभार मानले.
फोटोः 22955