

पिंपरी, ता. ६ ः औद्योगिक क्रीडा संघटनाच्या ५९ व्या शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत पीसीएमसी अ संघाने २२-२० असे विजेतेपद मिळवले तर फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा संघ उपविजेता ठरला.
निगडी -यमुनानगर येथील प्रबोधनकार ठाकरे मैदानावर टाटा मोटर्स, एसकेएफ, सीएएफव्हींडी, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडिया, बजाज ऑटो (वाळुंज), सेंचुरी एंका, महेंद्र चाकण अशा विविध कंपन्यांच्या १४ संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा चुरशीने चाललेल्या या सामन्यांमध्ये डॉनफॉस एटन, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, पीसीएमसी अ, सीएएफव्हीडी या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स व डॉनफॉस एटन या संघामध्ये उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यांमध्ये फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स १५-७, १५-७ असा विजेता ठरला तर पीसीएमसी अ व सीएएफव्हीडी या संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये पीसीएमसी अ संघाने १५-३,१५-१ असा विजय मिळवून, अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अंतिम फेरीत फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स व पीसीएमसी अ या दोन संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अत्यंत चुरशीने झालेल्या या अंतिम सामन्यांत पीसीएमसी अ संघाने २२-२० असे विजेतेपद मिळवले. पारितोषिक वितरण फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे प्रेसिडेंट अमित जेटली यांच्या हस्ते झाले. यावेळेस फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे प्लांट हेड जितेंदर राणा व रवींद्र चव्हाण, प्रमोद उत्तुरे, अशोक त्यागी, औद्योगिक क्रीडा संघटनाचे वसंत ठोंबरे, नरेंद्र कदम, हरी देशपांडे, विजय हिंगे, प्रदीप वाघ, श्रीनिवास मोरे उपस्थित होते. के. डी. वाघमारे यांनी आभार मानले.
फोटोः 22963
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.