Tue, March 21, 2023

पिंपरीत फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा ४१ वा ट्रेक उत्साहात
पिंपरीत फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा ४१ वा ट्रेक उत्साहात
Published on : 7 February 2023, 2:35 am
पिंपरी, ता. ७ : फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा ४१ वा ट्रेक रविवार (ता. ५) मार्कंडा मंदिर ते घोराडेश्वर जंगल ट्रेक या ठिकाणी झाला. ट्रेकमध्ये ५ वर्षाच्या लहान मुलांमुलीपासून ते ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ट्रेक प्रमुख विश्वास सोहनी, सुभाष चव्हाण व आनंत गावडे होते. या ट्रेकमध्ये ३१ सदस्यांनी भाग घेतला होता. सकाळी साडे साडेसहा वाजता मार्कंडा मंदिरापासून ट्रेकला सुरुवात झाली. वसंत ठोंबरे यांनी सर्व सदस्यांचे स्वागत केले. सुरक्षिततेच्या नियमांच्या सूचना देत. योगाची प्रार्थना व ११ ओमकार घेण्यात आले. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला.