Sat, March 25, 2023

उमाजी नाईक यांना
चिंचवडमध्ये अभिवादन
उमाजी नाईक यांना चिंचवडमध्ये अभिवादन
Published on : 9 February 2023, 1:09 am
पिंपरी, ता. ९ : चिंचवडमधील श्री शाहू महाराज पुतळा केएसबी चौकातील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळ चिंचवडच्या वतीने क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या १९१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख विठ्ठल बाबूराव कळसे, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक मित्र मंडळ अध्यक्ष राजू शशिकांत भोसले, थोरलीवाडी गावचे उपसरपंच फुलचंद यंपाळे, मंडळाचे मार्गदर्शक लखन दत्तात्रेय भोसले, नागेश भोसले, ऋषी मामले, लक्ष्मण खवडे, संतोष गुजले, राजु मंमाळे, जनार्दन गुजले, गणेश भोसले, बालाजी यंपाळे आदींनी अभिवादन केले.