Thur, March 30, 2023

क्रांती मित्रमंडळ संघाला
कबड्डी स्पर्धेत विजेतेपद
क्रांती मित्रमंडळ संघाला कबड्डी स्पर्धेत विजेतेपद
Published on : 12 February 2023, 9:18 am
पिंपरी, ता. १२ ः शिवसेना युवासेना, पिंपरी-चिंचवड, जिल्हा यांच्यावतीने हिंदुह्रदयसम्राट कबड्डी चषक २०२३ स्पर्धा चिखली येथे पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक क्रांती मित्र मंडळ कबड्डी संघ (पिंपळेगुरव), तर द्वितीय बक्षिस श्री फत्तेचंद जैन कबड्डी संघ (चिंचवडगाव) यांनी पटकावला.
या स्पर्धेत तृतीय बक्षिस भैरवनाथ कबड्डी संघ भोसरी यांनी पटकावले. स्पर्धेसाठी आमदार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर, केसरीनाथ पाटील, नीलेश बडदे, शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, संतोष सौंदणकर, धनंजय आल्हाट, सचिन सानप आदी उपस्थित होते. आयोजन विभागप्रमुख नितीन बोंडे व उपविभागप्रमुख प्रवीण पाटील यांनी केले होते. सर्जेराव कचरे यांनी सूत्रसंचालन तर शत्रुघ्न गोडगे यांनी आभार मानले.