सिटीझन जर्नालिस्ट

सिटीझन जर्नालिस्ट

बिजलीनगर रस्त्यावरील संरक्षक जाळी तुटली
बिजलीनगर वाल्हेकरवाडी येथील साईराज कॉलनी, शेखर मेडिकल समोरील रस्त्यावरील संरक्षक जाळी तुटून पडली आहे. त्यामुळे, अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संरक्षक जाळी तातडीने बसवण्याची व्यवस्था करावी.
- अमन शिराज शेख, पिंपरी

भांगरवाडीत पिसवांनी केले हैराण
भांगरवाडी, कृष्णा अपार्टमेंट, सहारा नेस्ट मागे, भोंडे हायस्कूलच्या शेजारील बिल्डींगच्या पार्किंगमध्ये भटक्या जनावरांमुळे पिसवा झालेल्या आहेत. पिसावा पायांस चावा घेतात त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. बिल्डींगच्या आवारात औषध फवारणी करण्यात यावी. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- सं. स. गायकवाड, भांगरवाडी, लोणावळा

महावितरणच्या डीपीची दुरवस्था
भोसरी येथे सर्वे नंबर १६, भैरवनाथ मंदिराजवळ, गुळवे वस्ती, इलेक्ट्रिक डीपी बॉक्सची दुरवस्था झाली आहे. इलेक्ट्रिक डीपी बॉक्सची तातडीने महावितरण प्रशासनाने दुरुस्ती करावी. अन्यथा, या भागात अपघात होण्याची शक्यता आहे.
- एक वाचक, भोसरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com