बांधकाम साहित्य माफियांविरोधात पोलिसांची कडक मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम साहित्य माफियांविरोधात 
पोलिसांची कडक मोहीम
बांधकाम साहित्य माफियांविरोधात पोलिसांची कडक मोहीम

बांधकाम साहित्य माफियांविरोधात पोलिसांची कडक मोहीम

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १६ : बांधकाम साहित्य जबरदस्तीने घेण्यासाठी दबाव आणणे, जबरदस्ती करणे किंवा काम चालू ठेवण्यासाठी खंडणी मागणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम तळेगाव दाभाडे पोलिसांनी हाती घेतली आहे. सोमाटणे, ओझर्डे, साईनगर गहुंजे, शिरगाव एक्स्प्रेस हायवे उजवी बाजू, उर्से एक्स्प्रेस हायवे उजवी बाजू या हद्दीतील सर्व लहान-मोठे बांधकाम व्यवसाय करणारे कॉन्ट्रक्टर आणि घर मालकांना पोलिसांनी त्याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत वाळू, खडी, क्रश किंवा इतर बांधकाम साहित्य जबरदस्तीने घेण्यासाठी जर कोणी दबाव आणत असेल किंवा ते साहित्य घेण्यास जबरदस्ती करत असेल किंवा काम चालू ठेवण्यासाठी बेकायदेशीर पैशाची (खंडणी) मागणी करत असेल तर पिंपरी-चिंचवड आयुक्तालय अंकित तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या (०२११४)-२२२४४४ या दूरध्वनी क्रमांकावर देखील संबंधितांना संपर्क साधता येईल.