गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

रिलेशन न ठेवल्यास तोंडावर ॲसिड फेकण्याची धमकी
पिंपरी ः ऑफिसमध्ये महिलेशी गैरवर्तन केले, कोणाला सांगितल्यास खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. रिलेशन न ठेवल्यास तोंडावर ऍसिड फेकण्याचीही धमकी दिली. हा प्रकार चिखली येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय उत्तम राठोड (रा. सौभाग्य रेसिडेन्सी, प्राधिकरण, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी याने फिर्यादीला ऑफिसमध्ये एकटीच असल्याचे पाहून त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यास फिर्यादीने विरोध केला असता याबाबत कोणाला सांगितले तर कंपनीत फ्रॉड केल्याची खोटी केस करून अडकविण्याची धमकी दिली. फिर्यादीचा चोरून पाठलाग केला. ‘तू जर माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाही तर. तुला रस्त्यात गाठून तोंडावर ॲसिड फेकीन, अशीही धमकी दिली. हा प्रकार म्हात्रे वस्ती येथील अप लिप्टो पॅकिंग सोल्यूशन्स कंपनी व फिर्यादीच्या घराजवळ घडला.
-------------
विनयभंगप्रकरणी एकाला अटक
महिलेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार तळवडे येथे घडला.
पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण गायकवाड (रा. रुपीनगर, तळवडे) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे त्यांच्या कंपनीत काम करीत असताना आरोपीने त्यांचा हात पकडला. अश्लील भाषेत बोलत त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार तळवडे, ज्योतिबानगर येथील जय मंगल इंडस्ट्रीज या कंपनीत घडला.
------------------
वेटरला मारहाण पोलिसांशी उद्धटपणाचे वर्तन
हॉटेलमधील वेटरला मारहाण करून पोलिसांशी उद्धटपणाचे वर्तन करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश गंगावणे (वय २८), भूषण राजेंद्र राक्षे (वय २६, दोघेही रा. रुपीनगर, तळवडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस शिपाई तानाजी कचरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हे वाल्हेकरवाडी रोडवरील एका हॉटेलसमोर मादक पदार्थांचे सेवन करून आले. सिगारेट घेण्याच्या कारणावरून हॉटेलच्या वेटरला हाताने मारहाण केली. तेथून पळून जात असताना त्यांची भरधाव दुचाकी घसरली. यामध्ये दोघेही जखमी झाले. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपींना थांबवले असता त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांशी उद्धटपणाचे वर्तन केले. आरडाओरडा करून शांततेचा भंग केला.
--------------------------
बनावट लेटरहेड, शिक्का तयार करून फसवणूक
बनावट लेटरहेड, शिक्का तयार करून माथाडी कामगार मंडळाची फसवणूक केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला. बाळू देवराम वाळुंज (रा. म्हाळसकर कॉलनी, वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने पिंपरी-चिंचवड माथाडी व असरंक्षित कामगार मंडळाच्या नावाचे बनावट लेटरहेड, शिक्का तयार केला. त्यावर खोटी सही करून ते पत्र हे निपॉन एक्स्प्रेस इन. प्रा. ली. म्हाळूंगेगाव चाकण औद्योगिक वसाहत, ता. खेड यांना देऊन माथाडी कामगार मंडळाची फसवणूक केली.
-------------
उघड्या दरवाजावाटे दागिने चोरीला
उघड्या दरवाजावाटे घरात शिरलेल्या चोरट्याने सोन्याचे दागिने चोरले. हा प्रकार आकुर्डीतील गंगानगर येथे घडला. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घरात शिरलेल्या चोरट्याने ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने व सहा हजारांची रोकड लंपास केली.
----------------------
ज्येष्ठ नागरिकाला मारहाणप्रकरणी एकाला अटक
ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना देहूगाव येथे घडली. याप्रकरणी संदीपान बापूराव एडके (वय ६९, रा. भैरवनाथनगर, निसर्ग हौसिंग सोसायटी, देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुबोध राधाकिसन प्रधान (वय २२, रा. चांगतपुरी, ता. परतूर, जि. जालना) याला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हे देहूगाव येथील पोलिस चौकीच्या शेजारी हातगाडीवर सरबत विकत असताना आरोपी त्याच्या सोबतच्या महिलेसोबत तेथे बर्फ खाण्यासाठी आला. दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. खाली पडल्याने बेशुद्ध झाले.
-------------------