
रवींद्रनाथ ठाकूरग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन उत्साहात
पिंपरी, ता. १६ ः स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निगडी प्राधिकरणातील रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालयाचा ३९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. सरस्वती प्रतिमा पूजन मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, कोषाध्यक्ष राजेंद्र त्रंबके, उद्योजक प्रसाद कुलकर्णी यांनी केले. ‘चला गुंफूया शब्दांच्या माळा’ काव्य वाचनात प्राची देशपांडे, सीताराम करकरे, अर्चना भांडारकर, अपर्णा देशपांडे, नरहरी वाघ, राजेंद्र करंबळकर, शर्मिला देसाई, शरद जोशी, शिल्पा बिबिकर, संगम कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, सुमती कुलकर्णी, जयंतन इतराजन आणि विनिता श्रीखंडे यांनी सहभाग घेतला. लोकसेवा शिक्षण संस्था अनुदानित आश्रम शाळा वाल्हीवरे (मुरबाड, जि. ठाणे) आणि अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा तळेरान (ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ग्रंथ भेट दिले. मुख्य अधीक्षक दिलीप पवार, अधीक्षक संदीप देशमुख, मुख्याध्यापक गणेश नलावडे उपस्थित होते. चंद्रशेखर जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास करंदीकर यांनी प्रास्ताविक केले. अनघा देशपांडे यांनी परिचय करून दिला. कमल खांबे यांनी आभार मानले.
---