निवडणूक निर्यण अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या खर्चाची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक निर्यण अधिकाऱ्यांकडून
उमेदवारांच्या खर्चाची तपासणी
निवडणूक निर्यण अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

निवडणूक निर्यण अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या तपासणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात (ग क्षेत्रीय कार्यालय, तिसरा मजला, थेरगाव) येथे ‘खर्च तपासणी कक्ष’ स्थापन केला आहे. त्याद्वारे उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी केली.
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतचा खर्च तपासला जाणार आहे. यापुढील दैनंदिन खर्चाची तपासणी २० व २४ फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे. त्यावेळी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना ढोले यांनी उमेदवारांना केली. निवडणूक आयोगाने खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी अनुषंगाने माहिती घेतली जात आहे. दरम्यान, भरारी पथक, स्थिर नियंत्रण, व्हिडिओ नियंत्रण व व्हिडीओ तपासणी पथके कार्यरत आहेत. उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. एकूण २८ उमेदवार असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि पावत्या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते. लेखाधिकारी इलाही शेख आणि त्यांच्या पथकाकडून हे काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे यांची नेमणूक केली असल्याचेही ढोले यांनी सांगितले.