मतदानयंत्र स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित एकूण ७१४ कंट्रोल युनिट, १४२८ बॅलेट आणि ७६५ व्हीव्हीपॅट सीलबंद मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित
पिंपरी, ता. १८ ः चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. ७१४ कंट्रोल युनिट, १४२८ बॅलेट युनिट आणि ७६५ व्हीव्हीपॅट अशा एकूण २९०७ मतदान यंत्रांचे सीलिंग (सीलबंद) करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या या प्रक्रियेनंतर सर्व मतदान यंत्रे थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. ही रूम सीलबंद करण्यात आली आहे. शिवाय याठिकाणी सुरक्षेविषयक सर्व काळजी घेण्यात आली असून, पुरेसा पोलिस बंदोबस्तदेखील येथे ठेवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
या सर्व मतदान यंत्रांची संगणकीय प्रणालीद्वारे मतदान केंद्रनिहाय सरमिसळ (रँडमायझेशन) उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या विशेष उपस्थितीत १५ फेब्रुवारी रोजी कमिशनिंग प्रक्रियेला सुरवात झाली होती. उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्यांना संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवण्यात आली. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्ट्राँग रूमला भेट दिली होती. तसेच या भवनामध्ये सुरु असलेल्या मतदान यंत्राच्या कमिशनिंग प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करून, सुरक्षा आणि इतर बाबींच्या अनुषंगाने सूचना त्यांनी केल्या होत्या.
ईव्हीएम सिलिंग कामकाजात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापू गायकवाड, माध्यम कक्ष समन्वयक किरण गायकवाड, नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांच्यासह भेल इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ, सेक्टर अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी यांचा सहभाग होता.
कोट
‘‘निवडणूक विषयक सर्व प्रक्रिया पार पाडताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे व पारदर्शक पद्धतीने निवडणूक विभाग कामकाज करीत आहे. कामकाजासाठी विविध कक्ष तयार करण्यात आले असून, यामध्ये अनुभवी आणि तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा विषयक व्यवस्थापन करण्यासाठी पोलिस प्रशासन काळजी घेत आहे. प्रत्येक कक्षास नेमून दिलेल्या कामकाजाचा आढावा घेतला जात असून, प्रत्यक्ष निवडणूक मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक सर्व प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी निवडणूक विभागाचे प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध कामकाज सुरु आहे.
-सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.