चिखलीत विवाहितेचा गळा आवळून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिखलीत विवाहितेचा 
गळा आवळून खून
चिखलीत विवाहितेचा गळा आवळून खून

चिखलीत विवाहितेचा गळा आवळून खून

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : विवाहितेचा छळ करीत, गळा आवळून खून केल्याची घटना चिखली येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
श्वेता प्रवीण जाधव (वय २७, रा. जाधववाडी, चिखली) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर त्यांचा पती प्रवीण काळूराम जाधव (वय २२), सासरा काळूराम विठ्ठल जाधव, सासू प्रणिला काळूराम जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. श्वेता या सासरी नांदत असताना माहेराहून पैसे आणण्यासह इतर कारणांवरून आरोपींनी त्यांना वेळोवेळी त्रास दिला. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. शनिवारीही त्यांच्याशी वाद घातला. पतीने त्यांचा गळा आवळून खून केला.
चिखली पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रवीण याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, काळूराम व प्रणिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्वेता या गृहिणी होत्या. पतीच्या किराणा दुकानात त्यांना मदत करायच्या.

----------------------
फोटोः 25854