Sat, March 25, 2023

थेरगाव परिसरामध्ये
उद्या वाहतुकीत बदल
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन
थेरगाव परिसरामध्ये उद्या वाहतुकीत बदल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन
Published on : 23 February 2023, 3:47 am
पिंपरी, ता. २३ : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (ता. २५) थेरगावमधील कामगार भवन येथील निवडणूक कार्यालयातून मतदान यंत्रांचे वाटप होणार आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य केंद्रावर नेण्यासाठी बसची सुविधा केलेली आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
तापकीर चौक ते थेरगाव पोलिस चौकीकडे जाणारी व येणारी वाहतूक बंद ठेवली जाणार असून, या मार्गावरील वाहने धनगरबाबा मंदिर व काळेवाडी फाटा मार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच थेरगाव पोलिस चौकीकडे येणारी वाहने बारणे कॉर्नरवरून डांगे चौक व बिर्ला चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. हा बदल शनिवारी (ता. २५) सकाळी नऊ ते रविवारी (ता. २६) रात्री बारा या कालावधीसाठी असेल.
------------------------