बोटावर लावलेल्या शाईचे कौतुक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोटावर लावलेल्या शाईचे कौतुक..
बोटावर लावलेल्या शाईचे कौतुक..

बोटावर लावलेल्या शाईचे कौतुक..

sakal_logo
By

विविध केंद्रांवर सकाळपासूनच नवमतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिल्यांदाच मतदान केल्याचे समाधान आणि बोटावर लावलेल्या शाईची आठवण कायम ठेवण्यासाठी सेल्फीची लगबग असे चित्र होते. यादीत नावे शोधण्यापासून प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेची उत्सुकतेने माहिती साऱ्यांनी करून घेतली. सहकुटुंब किंवा मित्रमंडळींसमवेत मतदान करून सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्यात येत होते.

नवमतदार म्हणतात
‘‘मला प्रचंड उत्सुकता होती. ही प्रक्रिया पहिल्यांदाच जवळून पाहता आली. ईव्हीएम मशिनवर मतदान करतानाचा आनंद मला मिळाला.’’
-प्राजक्ता प्रभात

‘‘पहिल्यांदा मतदान केले आहे. उमेदवाराची प्रतिमा आणि कार्याचा विचार मी निश्‍चित केला आहे.’’
- संस्कृती बाबर

‘‘पहिल्यांदा मतदान करणार आहोत, याचा आनंद होता. लोकशाही बळकट करण्याबरोबरच देश हित जोपासण्यासाठी हक्क बजावला. ’’
- गायत्री यादव


‘‘खूप कुतूहल होते. मतदान कसे करतात, यावेळी कोणते उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, त्यांचे पक्ष याची माहिती मी वाचली होती. त्यामुळे मला योग्य वाटलेल्या उमेदवाराला मत दिले. ’’
- श्रद्धा महामुनी

‘‘भारी वाटतेय. मतदान महत्त्वाचे असते, हे सतत कानावर पडले होते. त्यामुळे मतदान ओळखपत्र आलेल्या दिवसापासून खूष होतो. मतदानात प्रक्रियेत उत्साहाने सहभागी झालो’’
- प्रणव गायकवाड

‘‘पहिल्यांदा मतदान करणार असल्याने मनामध्ये अनेक प्रश्‍न आहेत. माझे एक मत मोलाचे असल्याने हुशार, सुशिक्षित, कार्यक्षम, जनसंपर्क असणाऱ्या उमेदवाराचाच विचार करून मतदान केले आहे.’’
-पल्लवी कोप्रेकर


‘‘आज मी पहिल्यांदा मतदान केले. त्यामुळे आमच्या मागण्या राज्यात नेणाऱ्या उमेदवाराला मत द्यायचे, असे मी ठरवले होते. बोटावर लागलेली पहिली शाई पाहताना मजा वाटली.’’
-प्राजक्ता काटे

‘‘आधीपासूनच कुतूहल होते. मी सर्व उमेदवारांचा अभ्यास केला होता. माझी मते ज्यांच्याशी जुळतात, त्यांनाच मी मतदान केले आहे.’’
-पूजा जकनाळे

‘‘यंदा मतदान करायला मिळणार म्हणून आम्ही आठ मित्रांनी मिळून एकत्र मतदार अर्ज घेतला होता. त्यातील दोघांची नावे यादीत आली नाहीत; पण आम्ही बाकीच्यांनी आवर्जून मतदान केले.’’
-मैथिली झोपे


‘‘मी एकटीच मतदानाला गेले होते. अनेकजण मतदान न करता राजकारण्यांना नावे ठेवतात, ही मानसिकता अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या मित्रांनी मतदान कर्तव्य पूर्ण करायचे ठरवले होते.’’
-शिल्पीका शेट्टी


‘‘सकाळी आठ वाजताच मी मतदान केले. कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे हा निर्णय माझा मी घेतला. मतदानाचे कर्तव्य बजावल्यावर मी देशाचा सुजाण नागरिक झालो आहे, अशी

भावना आली.’’
-नूतन जामदार


‘‘यावर्षी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले आहे. तरुणांसाठीच्या योजना राबवून शिक्षण, रोजगाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. ’’
-ईशा काळे


‘‘मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य असून, ते आपण बजावलेच पाहिजे. या भावनेतून मतदान केले.’’
-साक्षी पिंपळे

‘‘पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद नक्कीच आहे. त्याचबरोबर आता जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे.’’
-तन्मय कर

‘‘उमेदवाराने संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला हक्क मिळवून देऊन सर्वसमावेशक विकास साधला पाहिजे. अशाच उमेदवाराला मतदान केले आहे.’’
-तानिया दत्ता

‘‘बहीण आणि मी यावेळी मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावला. आपल्याला आता मतदानाचा हक्क मिळाला आहे, या गोष्टीचा खूप आनंद होतोय. आपण ज्याला मत देणार आहे, तो उमेदवार योग्य आहे का, निवडून आल्यावर तो विकासाची कामे करणार का, याचा विचार करूनच पहिल्यांदा मतदान केले.’’
-ईश्‍वरी व लक्ष्मी सारंग

२७२१७, ०९,१०,११,१२,१३,१४,१५,२७१९८,९९,२७२००,०१,०२,०३,०४,०५,०६,०७