
‘महात्मा फुले’मध्ये गझलांचा हुंकार
पिंपरी ः मानवी मनातील प्रीती, सुख-दुःख, आशा-आकांक्षा, विचार-विकार, भावभावना अभिव्यक्त करण्याचे काव्य म्हणजे मानवी मनाचा हुंकार असतो, असे मत गझलकार अभिजित काळे यांनी व्यक्त केले. पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिनेश भोसले यांचे ‘मराठी गझल : स्वरूप व विवेचन’ विषयावर व्याख्यान झाले. विविध गझल त्यांनी सादर केल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. मराठीतील विविध प्रकारचे साहित्य व मान्यवरांचे चरित्र वाचल्यास मराठीवर प्रभुत्व मिळवता येईल असा सल्ला त्यांनी दिला. प्रास्ताविक डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. डॉ. मृणालिनी शेखर, प्रा. शहाजी मोरे, प्रा. अनिकेत खत्री उपस्थित होते. डॉ. तृप्ती अंब्रे यांनी आभार मानले. प्रा. संग्राम गोसावी यांनी सूत्रसंचालन केले.