मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

sakal_logo
By

मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
थेरगाव येथील शंकर अण्णा गावडे कामगार भवन येथे आज गुरुवार (ता.२) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. बुधवारी (ता.१) सर्व कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम मशिनची मतमोजणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले. तसेच मतमोजणी कक्ष तयार ठेवला असून त्यात उमेदवारांच्या प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान कर्मचारी ओळख पत्र बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. संगणक तसेच प्रिंटर कामकाजासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. मतमोजणीच्या चारही बाजूने पोलिसांचा तसेच केंद्रीय पोलिस बल जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचीच ही चित्रमय झलक.
------------------------------------------------------------------------------------------------------