सिटीझन जर्नालिस्ट

सिटीझन जर्नालिस्ट

टोकदार केबलचे लोखंड धोकादायक
निगडी प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौकात वायरमधून टोकदार केबलचे लोखंड मागील कित्येक दिवसांपासून जमिनीच्या बाहेर आले आहे. त्यामुळे, नागरिकांना जाता-येता त्रास होतो आहे. अपघात होण्याची भीती बळावली आहे. संबंधित विभागाने तातडीने याची दखल घ्यावी.
- सुभाष राणे

यशवंतनगर चौकामधील शिल्प त्वरित काढावे
यशवंतनगर चौकाच्यामध्ये मोठे वर्तुळ तयार करण्यात आले आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढायला लागली आहे. या भागात मोठ्या कंपन्या असल्यामुळे मोठे कंटेनर वळायला येतात. परंतु, या शिल्पाच्या असलेल्या ओट्याच्या जास्त उंचीमुळे आणि मोठ्या वर्तुळामुळे कंटेनरला वळता येत नाही. त्यामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा रोज लागत आहेत. त्यामुळे हा चौक पूर्वीप्रमाणे करावा.
- एक वाचक

फुटपाथवर प्लास्टिक कचऱ्याचा खच
चाकण नगरपरिषद हद्दीतील महिंद्रा कंपनी समोर असलेल्या फुटपाथवर प्लास्टिक पिशव्या आणि घातक कचरा समाजकंटकांनी टाकला आहे. फुटपाथ वरून येणाऱ्या कामगारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा घातक कचरा अनेक दिवसांपासून फुटपाथवर पडून आहे. अजूनही नगर परिषदेतील प्रशासन आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे लक्ष या फुटपाथवर गेलेले नाही. त्यामुळे, पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत ही प्रशासकीय सर्व यंत्रणा संवेदनशील आहे का नाही असा प्रश्न पडतो. हा सर्व घातक कचरा काढून त्यावर योग्य प्रक्रिया करून फुटपाथ स्वच्छ करण्यात यावेत. कामगारांना निरोगी वातावरण निर्माण करून द्यावे. कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी हा फुटपाथ सीसीटीव्ही कार्यकक्षेत घेऊन कचरा करणाऱ्या विरुद्ध दंड आकारावा.
- राजेश जाधव, चाकण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com