पवना, अण्णासाहेब मगर बँकेसह २ पतसंस्थांची निवडणूक पुढील महिन्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवना, अण्णासाहेब मगर बँकेसह २ पतसंस्थांची निवडणूक पुढील महिन्यात
पवना, अण्णासाहेब मगर बँकेसह २ पतसंस्थांची निवडणूक पुढील महिन्यात

पवना, अण्णासाहेब मगर बँकेसह २ पतसंस्थांची निवडणूक पुढील महिन्यात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी असलेली पवना सहकारी बँक तसेच अण्णासाहेब मगर सहकारी बँक, पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्था व श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था यांची निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी नुकताच घोषित केला आहे. आवश्‍यकता भासल्यास पवना व अण्णासाहेब मगर सहकारी बँकेची निवडणूक नऊ एप्रिल रोजी तर; महापालिका सेवकांची पतसंस्थेची ११ व श्रमजीवी पतसंस्थेची सात एप्रिल रोजी होणार आहे.

पवना बँकेत भूमिपुत्रांची परंपरा...
शहरात पवना सहकारी बँक ही भूमिपुत्रांची तसेच पाहुण्या-रावळ्यांची बँक म्हणूनही प्रसिद्ध आहे. या बँकेवर माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांचे किंवा त्यांना मानणाऱ्या विचारांचे संचालक मंडळ सर्व काळ सत्ता पदावर राहिलेले आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व सर्व पक्षीयांबरोबर चांगले संबंध असलेले नेतृत्व असल्याने या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

महापालिका सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक अटीतटीची होणार
पिंपरी- चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्थेत सुमारे ३७३९ हजार मतदार आहेत. महापालिकेतील कर्मचारी या संस्थेचे बहुसंख्य सभासद आहेत. महापालिका कर्मचारी संघटनेची नुकतीच झालेली निवडणूक अटीतटीची झाली होती. न्यायालयातील आदेशानंतर पुन्हा फेर मतमोजणी करण्यात आली होती. फेरमोजणी झाल्यावरही पुन्हा वाद झाल्याने प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले. आता न्यायालयात येत्या १० मार्च रोजी सुनावणी व निकाल आहे. त्यामुळे महापालिका सेवकांच्या पतसंस्थेची ही निवडणूकही अटीतटीची होणार, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.

पवना बँकेचा निवडणूक कार्यक्रम
- निवडणूक निर्णय अधिकारी : श्रीमती शीतल पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (६).
- संचालकांच्या जागा : १९
- अर्ज दाखल तारीख : ३ ते १० मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- अर्ज छाननी : १३ मार्च सकाळी ११.३० वाजता.
- ग्राह्य अर्जांची यादी प्रसिध्दी तारीख : १४ मार्च २०२३
- अर्ज मागे घेण्याची तारीख : १४ ते २८ मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेदवारांना निशाणी वाटप तारीख : २९ मार्च २०२३
- गरज भासल्यास मतदान तारीख : ९ एप्रिल २०२३ (सकाळी ९ ते सायंकाळी ५)
- मतमोजणी व निकाल तारीख : १० एप्रिल २०२३

अण्णासाहेब मगर बँकेचा निवडणूक कार्यक्रम -
- निवडणूक निर्णय अधिकारी : दिग्विजय आहेर, विभाग उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे विभाग.
- संचालकांच्या जागा : १५
- अर्ज दाखल तारीख : ३ ते १० मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- अर्ज छाननी : १३ मार्च सकाळी ११ वाजता.
- ग्राह्य अर्जांची यादी प्रसिध्दी तारीख : १४ मार्च २०२३
- अर्ज मागे घेण्याची तारीख : १४ ते २८ मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेदवारांना निशाणी वाटप तारीख : २९ मार्च २०२३
- गरज भासल्यास मतदान तारीख : ९ एप्रिल २०२३ (सकाळी ९ ते सायंकाळी ५)
- मतमोजणी व निकाल तारीख : १० एप्रिल २०२३

पिंपरी चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्था निवडणूक कार्यक्रम -
- निवडणूक निर्णय अधिकारी : पंकज राऊत, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-३.
- संचालकांच्या जागा : १८
- अर्ज दाखल तारीख : ८ ते १४ मार्च २०२३ (दुपारी ४ पर्यंत)
- अर्ज छाननी : १५ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता.

- ग्राह्य अर्जांची यादी प्रसिध्दी तारीख : १६ मार्च २०२३
- अर्ज मागे घेण्याची तारीख : १६ ते ३१ मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेदवारांना निशाणी वाटप तारीख : ३ एप्रिल २०२३
- गरज भासल्यास मतदान तारीख : ११ एप्रिल २०२३ (सकाळी ९ ते सायंकाळी ५)
- मतमोजणी व निकाल तारीख : ११ एप्रिल २०२३ रोजी मतदानानंतर लगेच

श्रमजीवी नागरी सहकारी पतसंस्था, काळेवाडी
- निवडणूक निर्णय अधिकारी : नागनाथ कंजेरी, उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-३.
- संचालकांच्या जागा : १५
- अर्ज दाखल तारीख : ३ ते १० मार्च २०२३ (दुपारी ४ पर्यंत)
- अर्ज छाननी : १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता.
- ग्राह्य अर्जांची यादी प्रसिध्दी तारीख : १४ मार्च २०२३
- अर्ज मागे घेण्याची तारीख : १४ ते २८ मार्च २०२३ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
- उमेदवारांना निशाणी वाटप तारीख : २९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता
- गरज भासल्यास मतदान तारीख : ७ एप्रिल २०२३ (सकाळी ९ ते सायंकाळी ५)
- मतमोजणी व निकाल तारीख : ८ एप्रिल २०२३