उन्हामुळे हैराण झालेल्या शहराला पावसामुळे थंडावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हामुळे हैराण झालेल्या शहराला पावसामुळे थंडावा
उन्हामुळे हैराण झालेल्या शहराला पावसामुळे थंडावा

उन्हामुळे हैराण झालेल्या शहराला पावसामुळे थंडावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : शहर व परिसरात मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह तासभर पाऊस बरसला. रंगात न्हाऊन गेलेल्यांच्या उत्साहाला मात्र यामुळे उधाण आले. तर गेले काही दिवस उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे थंडावा मिळाला.

सोमवारी (ता. ६) सायंकाळपासूनच होळीपूजना वेळी पावसाला सुरुवात झाली. मात्र, काही वेळातच थांबल्याने थोड्या उशिराने होळीपूजन करण्यात आले. विजांचा कडकडाट सुरूच होता. त्यानंतर मंगळवारी पहाटे व सकाळीही मावळसह देहूरोड, देहू या भागात जोरदार हजेरी लावली. शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, मोशी, कासारवाडी, निगडी आदी भागात पाऊस झाला. तसेच रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड या भागातही हलक्या सरी कोसळल्या.

दरम्यान, सोसाट्याचा वारा सुटल्याने चिंचवडमधील केशवनगर शाळा ते काळेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर एक झाड पडले. त्यामुळे रस्ता काही वेळासाठी बंद झाला. नवी सांगवी, समता नगर येथेही एक झाड उन्मळून पडले.