‘महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे’
‘महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे’

‘महिलांनी आरोग्याला प्राधान्य द्यावे’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः ‘‘महिलांचा सन्मान करून आपण सर्वजण स्त्री शक्तीला प्रेरणा देऊया. महिलांनीही स्वतःच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि आरोग्य संपन्न व्हावे,’’ असे आवाहन महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महापालिका कामगार कल्याण विभागातर्फे भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सिंह बोलत होते. सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्ज्वला आंदुरकर, उपअधीक्षक डॉ. मनीषा सूर्यवंशी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, डॉ. वर्षा घोगरे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. सुजाता गायकवाड, भूलतज्ज्ञ डॉ.अर्चना गांधी, प्रशासन अधिकारी रोहिणी शिंदे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, संगणक अधिकारी अनिता कोटलवार, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी शुभांगी चव्हाण, सविता निगडे, हेंड्रिना जॉन, राजश्री गीते आदी उपस्थित होत्या.
महापालिका सखी ग्रुपतर्फे ‘लकी ड्रॉ’ उपक्रमाचे संयोजन अनिता बाविस्कर, कविता माने, रतन वारंग, गीता धंगेकर, रूपाली निकम, मनीषा स्वामी, वंदना मोरे, प्रीती बिजवे, विजया कांबळे, मीनाक्षी गरुड, मेघा काटे यांनी केले. ‘लकी वूमन खेळात इ क्षेत्रीय कार्यालयातील मीना सुपे यांचा सत्कार केला. अन्य खेळात मीनल साळुंखे (प्रथम), मयूरी पुराणिक (द्वितीय), सुमेधा नाफाडे (तृतीय) विजेत्या ठरल्या. मराठी, हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा के. डी. कड, अभिजित राजे, डॉ. अश्विनी रानडे आणि सहकाऱ्यांनी सादर केला. ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘मेरे सपनो की राणी’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’, ‘अगंबाई अगंबाई’, ‘सैराट’, ‘चंद्रा’, ‘वेड लागले’, ‘चोरीचा मामला’ अशी गाणी सादर केली. चारुशीला जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सीमा सुकाळे यांनी आभार मानले.