
महापालिकेतर्फे आजपासून निगडीत रानजाई महोत्सव
पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या वतीने १० ते १२ मार्च या दरम्यान २६ वे फुले, फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन ‘रानजाई’ महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
निगडी प्राधिकरण येथील महापौर निवासस्थान येथे प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी बारा वाजता शशांक कोवाल यांचा लाइव्ह बँड’ कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता व्याख्याते प्रदीप त्रिपाठी यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पर्यावरण संवादक सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. सायंकाळी सात मनोरंजनात्मक विविध खेळ घेण्यात येणार आहेत.
शनिवारी (ता. ११) सायंकाळी चार वाजता रघुनाथ ढोले यांचे व्याख्यान होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ‘निसर्गाच्या कविता’ हे कवी संमेलन होईल. सिद्धांत कालमेघ यांचा सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सादर करतील. रविवारी (ता.१२) सायंकाळी पाच वाजता आर. जे. अक्षय यांच्यासोबत मनोरंजनाच्या विविध खेळांचे कार्यक्रम होतील. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे.