
''अॅप्टिट्यूड आयडॉल’ स्पर्धा नोंदणीसाठी आज अंतिम तारीख विद्यार्थ्यांसाठीच्या ''अॅप्टिट्यूड आयडॉल-२०२३’स्पर्धा
पिंपरी, ता. ९ ः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख बनविण्यासाठी शनिवारी (ता.११) ‘माटीपीओ ॲप्टिट्यूड आयडॉल-२०२३’ ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणीची १० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातून तीस हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स ( MaTPO) व महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) यांनी संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धा निःशुल्क आहे. पी.एच.एन. टेक्नॉलॉजी, ईबेक लँग्वेज लॅबोरेटरीज, एऑन-कोक्युबस्, ग्लोबल ड्रीम्स, कँपस क्रिडेंशीअल, आय स्कूल कनेक्ट टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर व इशरे-पुणे चॅप्टर हे या स्पर्धेचे प्रायोजक असल्याची माहिती महाराष्ट्र टी.पी.ओ. असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे व डीटीईचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली आहे.
-कोण सहभागी होवू शकते
बी.ई./ बी.टेक / एम.ई. / एम.टेक. / डिप्लोमा / बीसीए / एमसीए / बीसीएस / एमसीएस / बीबीए / एमबीए / बी.एससी. / एम.एससी. / बी.फार्म. / एम.फार्म. व इतर कोर्सेसचे प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष यातील सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल, टॅब, स्मार्टवॉच, बॅग यासारखी पारितोषिके दिली जाणार आहेत.
येथे करा नोंदणी
नाव नोंदणी लिंक: या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी https://tinyurl.com/MaTPO-Aptitude-Idol-2023 या लिंक वरती ऑनलाइन नाव नोंदणी करावी.
याचे असणारे फायदे
कॅम्पस रिक्रूटमेंटमध्ये कंपन्यांकडून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. याबद्दल विद्यार्थ्यांना चालना मिळेल. ते आगाऊ तयारी करतील. महाराष्ट्रातील महाविद्यालयांची प्लेसमेंट टक्केवारी मिळेल.