Fri, March 31, 2023

विनयभंगप्रकरणी पोलिस हवालदारावर गुन्हा
विनयभंगप्रकरणी पोलिस हवालदारावर गुन्हा
Published on : 13 March 2023, 3:24 am
पोलिस हवालदारावर
विनयभंगप्रकरणी गुन्हा
पिंपरी, ता. १३ : भांडणात पोलिस हवालदारासह एकाने महिलेशी गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना मोशीतील नागेश्वर कॉलनी येथे घडली.
याप्रकरणी अमोल परदेशी (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे तर पोलिस हवालदार राजन परदेशी (वय ५२) याच्यासह दोन महिला (रा. शिवाजीनगर पोलिस लाईन, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. राजन परदेशी पोलिस दलात कार्यरत आहे. पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात सार्वजनिक रस्त्यासाठी जागा सोडण्यावरून वाद आहे. या कारणावरून त्यांच्यात भांडण सुरू होते. यावेळी अमोल व राजन यांनी महिलेशी गैरवर्तन केले. तसेच दोन महिलांनी शिवीगाळ करीत मारहाण केली.