अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

महिला विभागातर्फे ई-कचरा, प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम

पिंपरी ः स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे ई-कचरा, प्लास्टिक कचरा संकलन उपक्रम राबविण्यात आला. सुखदा भौंसुले व निसर्ग मित्र विभागाचे मनेश म्हस्के यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्राधिकरणातील नागरिकांनी ई-कचरामध्ये संकलनातील उपक्रमामध्ये जुने रेडिओ कॅसेट, टेप रेकॉर्डर, कुलर, मायक्रोवेव्ह तसेच इतर वस्तू तसेच प्लास्टिक कचरा संकलनात प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू कार्यालयात आणून दिल्या. महिला कार्यकारिणीच्या सचिव ॲड. हर्षदा सचिन पोरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांना या महाअभियानाची माहिती दिली.

विरंगुळा केंद्राच्यावतीने ‘ती’चा सन्मान
पिंपरी ः संत तुकारामनगर मधील ‘विरंगुळा केंद्रात’ धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्यावतीने बचत गटातील महिलांचा सन्मान व त्यांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी महिलांना बचत गट कसे चालवावेत? तसेच बचत गटांच्या माध्यमातून उद्योग कसा उभा करावा? या संदर्भात मार्गदर्शन केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोजिका वनिता कांबळे, समूह संघटक वैशाली लगाडे उपस्थित होत्या. वंदना आराख, सोनाली कनवर, पल्लवी लहाने, प्रतिभा गुरव, शबाना शेख, संगीता भारती, लक्ष्मी कांची, मंगला शिरसागर, लता लोखंडे, प्रतिभा वानखेडे, प्रिया ढेरंगे, रजिया शेख, फातिमा शेख, रेखा जाधव, जयश्री अडसूळ, भारतीय अंभोरे, सीमा लोंढे, रेखा वाखाडे, साक्षी हजारे, अलिदा सोनिकर, निशा सरोज, दीपाली कांबळे, किरण आराख आदी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. कार्यक्रमाचे आयोजन धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष म्हात्रे व महिला प्रमुख नीलम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.


पिंपरी ः पिंपरी चौकातील क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारकामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस शहर मराठा सेवा संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव , सहसचिव सचिन दाभाडे, सुरेश इंगळे, गोविंद खामकर यांनी मनोगत व्यक्त केले.


पिंपरी ः चिंचवड येथे कै. मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि महिला बचत गट महासंघाच्यावतीने होम मिनिस्टर तसेच विविध कार्यक्रम घेतले. यावेळी महिलांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये वेगवेगळ्या खेळांच्या ७ फेऱ्या झाल्या त्यामधून २१ जण अंतिम फेरीसाठी निवडून आले. प्रसिद्ध भाऊजी मधुसूदन ओझा यांनी कार्यक्रमात रंगत आणली. प्रथम क्रमांकाचे बक्षीस अश्विनी जोशी (स्मार्टफोन), द्वितीय क्रमांकाचे नीता गायकवाड (कुलर) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सुनीता राठोड यांनी पटकाविले. बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण हर्षवर्धन भोईर यांनी ७ नूतन बचत गटांचे उद्‍घाटन केले. किरण भोईर यांनी उपस्थितांना बचत गटांची माहिती सांगितली. भारती पाटील, मंगल ढगे, प्रतिभा कंकाळे, अर्चना बोरसुने, रत्ना शेगर, सुप्रिया भिंगारे, अनिता गायकवाड, मनीषा शहा, मीनाक्षी पोईपकार, लता चौघुले उपस्थित होत्या.


पिंपरी ः त्रिवृक्ष संगम दत्त मंदिरातर्फे मोशी- प्राधिकरण परिसरातील महिलांकरिता वक्तृत्व स्पर्धा, खेळ असा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. वक्तृत्व स्पर्धेत आधुनिक स्त्री या विषयांवर भाषण केले. ‘नारी तू नारायणी’ हे लघुनाट्य सादर केले. या लघुनाट्याला परिसरातील स्त्रियांनी टाळ्यांचा कडकडाट करून मोठा प्रतिसाद दिला. धावणे, लिंबू चमचा, संगीत खुर्ची या खेळात महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी श्री गुरदत्तांची महाआरती केली. यावेळी माजी नगरसेविका सीमा सावळे, नम्रता लोंढे, गीता महेंद्र , वनिता आल्हाट, पुजा बोऱ्हाडे, निता खाडे उपस्थित होत्या. सुरेश कर्डिले, दिपक नाईक, संग्रामसिंह पाटील, जालिंदर खिलारी, पुरुषोत्तम बढे, धीरज नेहते, पांडुरंग खरचे , मीनाक्षी हांडे यांनी विशेष मेहनत घेतली.