
डॉ. प्रविण सोनी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अभ्यासमंडळावर बिनविरोध निवड
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या
अभ्यासमंडळावर प्रविण सोनी
पिंपरी, ता. २३ : यशवंतराव चव्हाण रुग्णालयामधील मेडिसीन विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. प्रवीण सोनी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अभ्यासमंडळावर बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमध्ये क्लिनिकल मेडिकल सब्जेक्ट मेडिसीन व अलाईड सब्जेक्टकरिता बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळातील अभ्यास मंडळाचा २० मार्च २०२३ रोजी निकाल लागला. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निकाल जाहीर केला. विजयी उमेदवारांचे विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी अभिनंदन केले. प्रवीण सोनी यांच्यासह एकूण ५ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
फोटोः 32311