एमआयटी महाविद्यालयातर्फे आळंदीत व्यवस्थापन सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयटी महाविद्यालयातर्फे
आळंदीत व्यवस्थापन सप्ताह
एमआयटी महाविद्यालयातर्फे आळंदीत व्यवस्थापन सप्ताह

एमआयटी महाविद्यालयातर्फे आळंदीत व्यवस्थापन सप्ताह

sakal_logo
By

पिंपरी, ता.२३ ः आळंदी येथील एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाने ‘व्यवस्थापन सप्ताह - इप्सम -२०२३’ हा आंतर महाविद्यालयीन कार्यक्रम घेतला. यामध्ये मनी आयलँड (शार्क टॅंक), बिझनेस क्विझ, (व्यावसायिक प्रश्नमंजुषा), वादविवाद स्पर्धा, डिटेक्टिव्ह गेम, पेपर ट्रेडिंग, १ मिनिटांचे भाषण, १ मिनिटांचे खेळ, प्रॉडक्ट व फूड स्टॉल आदी स्पर्धां घेतल्‍या.
प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, प्रथमेश जवळेकर, शंतनू लाकळ, सतीश टिंगरे, सचिन दूसंगे, दीक्षा संचेती यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. या स्पर्धांसाठी पुणे शहर व शहराबाहेरील १८ महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था व विद्यापीठांमधून २२८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक म्हणून मुनोत फर्म मनमाड, डी. एस. क्रीएशन्स मनमाड, प्रथमेश ज्वेलर्स, खेड पुणे, वाय. ए. टेकनोसोलुशन्स, पुणे, प्रिंट हब आळंदी, संदीप आर्टस्, आळंदी, श्री गणेश डेव्हलपर्स, विश्रांतवाडी, हॉटेल विश्रांती, पुणे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्राचार्य, उपप्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
व्यवसाय प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश भोपळे, कार्यक्रम समन्वयक डॉ. शैलेंद्र पाटील, डॉ. अमोल माने, प्रा. आकांक्षा लांडगे डॉ. शरद कदम, डॉ. रितूजा देशपांडे, प्रा. हनुमंत शिंगाडे, प्रा. निर्मल बाबू द्विवेदी तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट घेतले. यासाठी प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी व डॉ. मानसी अतितकर यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोः 32412