
गुटख्याचा साठा; दोघांना अटक
पिंपरी, ता. २६ : बेकायदारित्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोघांना अटक केली. आरोपींकडून तीन लाखांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.
निहार गोपाल विश्वास (वय ५१) व अविजीत रणजित बाच्छार (वय २६, दोघेही रा. म्हस्करनेस कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस गस्त घालत असताना एक मोटार गुटख्याचा माल घेऊन कडोलकर कॉलनी येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कडोलकर कॉलनी परिसरात सापळा रचला. मोटार थांबवून दोघांना ताब्यात घेत मोटारीची तपासणी केली असता, त्यामध्ये दोन लाख ९४ हजार ५५४ रुपये किमतीचा गुटखा सापडला. या आरोपींकडून गुटख्यासह मोटार व दोन मोबाईल असा एकूण सात लाख ५४ हजार ५५४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
------------------------