

सूचना
- डिझाईन मध्ये वर भाजप नेते शेवटी महेशदादा, मा. महापौर नितीन आप्पा काळजे, विकास बुर्डे असा प्रोटोकॉल लावणे...
- खाली एका बाजूला भारत माता, तुळजाभवानी छ. शिवाजी महाराज श्री राम मंदिर, श्री राम, भगवे कपडे घातलेले महेशदादा....
---
समाजकार्यात कायम अग्रेसर
माहेरूनच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने माजी नगरसेविका सुवर्णा बुर्डे या नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांचे चुलते चाकणचे उपसरपंच होते. त्यांनी गावाचा विकास करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि लग्नानंतर चऱ्होलीत आल्यावर सासरची सामाजिक बांधिलकी सुवर्णा बुर्डे यांनीही जपली आहे. त्यामुळे समाजकारण व राजकारणाचा माहेर व सासरकडून कौटुंबिक वारसा त्यांना लाभला आहे. तोच त्या पुढे चालवत आहेत.
- सुवर्णा विकास बुर्डे
सा सरे हिरामण पाडुरंग बुर्डे, चुलत सासरे ज्ञानेश्वर पांडुरंग बुर्डे, पती विकास हिरामण बुर्डे आणि त्यांचा मित्र परिवार करीत असलेली सामाजिक कार्य बघून सुवर्णा बुर्डे घराबरोबरीने गावाच्या कामकाजात जातीने लक्ष देत आहेत. पती विकास बुर्डे यांनी गेल्या वीस वर्षांमध्ये केलेल्या कामाची जोड सुवर्णा बुर्डे यांना मिळाली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेले चऱ्होली आणि प्रभागाच्या आसपासची गावे मागील अनेक वर्षांपासून मूलभूत समस्यांसाठी झगडा देताना आज मात्र स्वतःची ओळख निर्माण करण्यास यशस्वी झाली आहेत. त्याला कारण म्हणजे नगरसेविका झाल्यानंतर सुवर्णा बुर्डे यांनी साडेचार वर्षांत चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडीसह बारा वाड्यांमध्ये, डुडुळगाव, मोशी, गंर्धवनगरी, भोसरी परिसर विकासासाठी कष्ट घेतले आहेत. त्यांच्या कुटुंबासह मित्र परिवाराने घेतलेल्या कष्टामुळे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या आहेत.
शेती ते उपनगर
भाजीपाला व फुलशेतीसाठी प्रसिद्ध असलेला चऱ्होली आणि आसपासचा परिसर वीस वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानंतर मागील पाच ते सात वर्षांमध्ये हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. माहेरूनच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने नगरसेविका सुवर्णा बुर्डे या कायमच समाजकार्यात अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांचे चुलते चाकण येथे उपसरपंच होते. त्यांनी गावाचा विकास करण्यासाठी घेतलेले कष्ट आणि लग्नानंतर चऱ्होलीत आल्यावर सासरची सामाजिक बांधिलकी सुवर्णा बुर्डे यांनीही जपली आहे.
राजकारणात संधी
आमदार महेशदादा लांडगे व मा. महापौर नितीन अप्पा काळजे यांच्यामुळेच राजकारणात संधी मिळाल्याचे सुवर्णा बुर्डे यांचे मत आहे. त्या म्हणतात, ‘‘माझे चुलते चाकण भागात उपसरपंच होते. त्यांनी तेथील भागात केलेले काम मी पाहत होते. लग्नानंतर मी चऱ्होली भागात आले. माझे सासरे, चुलत सासरे, पती आणि त्यांचा मित्र परिवार चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडीसह बारा वाड्यांमध्ये, डुडुळगाव, मोशी, गंर्धवनगरी, भोसरी परिसर आसपासच्या प्रभागासाठी कायमच काम करीत आला आहे. माझ्या सासूबाई देखील समाजकार्यात सक्रिय असतात. कुटुंबाचा विकास एक स्त्री करते. त्यामुळे आपले गाव व प्रभागाचा विकास करण्यासाठी मी या कार्यात सहभागी व्हावे, अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यातच माहेरून मिळालेले बाळकडू आणि सासरच्या प्रेरणेमुळे मी राजकारणात आले. आमदार महेशदादा लांडगे हे स्थायी समितीचे २०१४ ला अध्यक्ष झाले. दादांनी या भागासाठी विशेष प्रयत्न करून येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम सुरू केले होते. २०१२ मध्ये आमचे प्रमुख सहकारी, मित्र नितीन काळजे या भागाचे नगरसेवक झाले. त्यानंतर याभागात विकास कामांना सुरुवात झाली. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझा मित्र परिवार आणि बारा वाड्या-वस्त्यांवरील मित्र परिवार काम करीत आहे.
यशस्वी वाटचाल
प्रभाग क्रमांक तीनमध्ये सन्माननीय आमदार श्री महेशदादा लांडगे
यांच्या व्हीजन-२०२० अंतर्गत अद्वितीय असे प्रकल्प साकारत आहेत. मोशी येथे साकारत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्यदिव्य क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे चारशे कोटींचा खर्च अपेक्षित असून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. काही फंडही मंजूर झाला आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्रमांक १/२०४ येथे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या कामासाठी २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात चारशे कोटी रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गहुंजे येथे स्टेडियम झाल्यापासून पुण्यात क्रिकेट सामने होणे बंद झाले आहे. गहुंजे स्टेडियमच्या धर्तीवरच मोशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे नियोजन आहे. मोशीत क्रिकेट स्टेडियम झाल्यास पुणे जिल्ह्यात तीन स्टेडियम होतील.
मोशीत आयटी हब...
राज्य सरकारने नवीन माहिती तंत्रज्ञान आणि साहाय्यभूत सेवा धोरण २०२३ (आयटी) तयार केले आहे. उद्योगनगरीतील मोशी, चऱ्होलीत राज्यातील पहिले माहिती तंत्रज्ञान आणि साहाय्यभूत सेवा धोरण १९९८ मध्ये तयार केले होते. या धोरणाचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे या क्षेत्रात निर्यात तसेच गुंतवणुकीत सातत्यपूर्ण वाढ झाली. यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा पाया मजबूत झाला, राज्यातही अनुकूल वातावरण आहे. हिंजवडी, तळवडे, खराडी आयटी पार्क कार्यान्वित झाले आहेत. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत २५ वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आयटी पार्क निर्मिती होत आहे. व्यापक विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान उद्याने, माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर, एव्हीजीसी तसेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला भारताची तंत्रज्ञानविषयक राजधानी म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्मिती करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यात येईल, यामध्ये मुद्रांक शुल्कमाफी, ऊर्जा सुसूत्रीकरणाचे लाभ, विद्युत शुल्क सूट, बाजार विकास साहाय्य, पेटंट संबंधित साहाय्य, मालमत्ता कर सूट, कोणत्याही क्षेत्रात अर्थात रहिवासी, ना-विकासक्षेत्रासह हरितक्षेत्र इत्यादी क्षेत्रात आपटी झोन विकसित करण्याची मुभा, अत्यावश्यक सेवेचा दर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर, अतिरिक्त चटईक्षेत्र अशा विविध पातळीवर रेडकार्पेट देण्यात येणार आहे. सुमारे १० एकर जागेत ५० टक्के आयटी आणि ५० टक्के कोणत्याही वापरासाठी प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकार प्रोत्साहन देणार आहे. औद्योगिकनगरी, ऑटो हब, आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयटी पार्क विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आयटी पॉलिसीचा अभ्यास सुरू असून, या धोरणानुसार पहिला प्रकल्प मोशी-चऱ्होली-चिखली या झपाट्याने विकसित होणाऱ्या समाविष्ट गावांमध्ये व्हावा, याकरिता पुढाकार घेतला आहे. नवीन आयटी धोरणाची अंमलबजावणी करून पहिला आयटी प्रकल्प पिंपरी-चिंचवडमधील वेगाने विकसित होणाऱ्या चऱ्होली- मोशी- चिखली रेसिडेन्शिअल कॉरिडोरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार महेश लांडगे यांचे मत आहे. तेच पूर्णत्वास नेण्यासाठी मी कार्यान्वित आहे. नवीन आयटी धोरण राज्य सरकारने आखले आहे. आपल्याकडे हिंजवडी व तळवडे आयटी पार्क आहे. लोहगाव विमानतळाजवळ असल्यामुळे मोशी, चऱ्होली भागात आणि हिंजवडी आयटी पार्कजवळ असल्याने लगतच्या वाकड, ताथवडे, पुनावळे भागात आयटी पार्क उभारणे शक्य होणार आहे. त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. त्याला राज्य सरकारची परवानगी मिळू शकते. ती मिळाल्यानंतर वाकड, ताथवडे, पुनावळे, मोशी, चऱ्होली भागात आयटी पार्क होईल.
विकासाचा महामार्ग...
पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती शिल्पसमूह ते पुणे-नाशिक महामार्गावरील स्पाइन रस्ता, जय गणेश साम्राज्य, मोशीतील गंधर्वनगरी, वडमुखवाडी, ताजणेमळा, काळजेवाडी, पठारे मळा, भोसले वस्ती, बुर्डे वस्ती तेथून पुढे अहमदनगर महामार्गाला जोडणारा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल घडविणारा विकासाचा महामार्ग ठरणार आहे. याच महामार्गाच्या दुतर्फा आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम तसेच आयटी हब उभारले जाणार आहे.
पाण्याच्या टाक्या
आमदार महेश लांडगे यांच्या २०१७ मध्ये पाणीपुरवठ्यासंदर्भात दिलेला शब्द प्रभाग तीनमध्ये तंतोतंत पाळला आहे. बुर्डे वस्ती, वाघेश्वर महाराज मंदिर, प्राइड सिटी तसेच विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीनमधील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नवीन पाण्याचा स्रोत या भागामध्ये राबविला जाणार आहे. त्यामुळे या भागामध्ये वाढलेल्या लोकसंख्येला मोठासा दिलासा मिळणार आहे
बैलगाडा घाट...
ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज यात्रा परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांचा जीव की प्राण असलेला बैलगाडा शर्यतीसाठी अद्ययावत असा बैलगाडा घाट बांधला जात आहे. या घाटामध्ये बैलगाडा मालकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत.
श्री शंभू महाराज आखाडा
महाराष्ट्राची शान असलेला कुस्ती हा मैदानी खेळ प्रसिद्ध आहे. या मैदानी कुस्तीमधील मातीतील कुस्तीसाठी अद्ययावत असा आखाडा नव्याने साकारला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रसिद्ध पहिलवानांसाठी हा शंभू महाराज कुस्ती आखाडा आकर्षण ठरणार असून, या त्यात भविष्यातील महाराष्ट्र केसरी घडणार आहेत.
रेशन कार्ड योजना...
प्रभागातील गरजू नागरिकांना हजारो नागरिकांना रेशनकार्ड काढून देण्यात आले. त्यामुळे शासनाच्या शिधा मिळण्यासाठी नागरिकांना या रेशनकार्डचा लाभ होत आहे.
आरोग्य कार्ड...
महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रभागातील सुमारे चार ते पाच हजार नागरिकांना आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. या आयुष्यमान भारत योजनेचा घरोघरी प्रसार करत व कार्ड वाटप करत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
कल्याण योजना घरपोच...
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांसाठी ज्या-ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचाही फायदा प्रभागातील नागरिकांनी घेतला असून, ही योजना राबविण्यात यश येत आहे.
पोस्ट कार्यालय सुकन्या योजना...
पोस्ट कार्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या सुकन्या योजनेची माहिती घरोघरी पत्रके देऊन तसेच सविस्तर माहिती देऊन या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी तीर्थयात्रा...
आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्यातून प्रभागातील सुमारे २७०० महिला व ३००० कार्यकर्ते मित्र परिवारासह १७ जानेवारी ते २४ जानेवारी २०२३ पर्यंत देवदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. या देवदर्शन यात्रेमध्ये प्रभागातील हजारो महिलांनी लाभ घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.