प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचे वाढदिवस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या
सभासदांचे वाढदिवस उत्साहात
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचे वाढदिवस उत्साहात

प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचे वाढदिवस उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचे वाढदिवस व त्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रांगणात उत्साहात झाला. रेलविहार संघातील सभासदांनी विविध गीते, सामूहिक नृत्य सादर केले.
भगवान महाजन, काशिनाथ पाटील यांनी संयोजन केले. शोभा पाटील, भगवती टाक, आशा पाटील, नीता भरोडिया आदींनी सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वाटप संघाच्या अध्यक्ष चांदबी सय्यद यांच्या हस्ते झाले. आनंदराव मुळूक यांनी विडंबन गीत ‘चल ग मेट्रो झरा झरू’ आणि सतीश सगदेव यांच्या ‘वऱ्हाड निघालय लंडनला'' (काही प्रवेश) (प्रथम विभागून); शैलजा महाजनी यांचा तराणा व ज्योती कानिटकर यांचे मुक्तछंद (द्वितीय विभागून) आणि ललिता जोशी, शैलजा महाजनी, पंडित वंदना उंब्रजकर, वसुधा जोशी यांच्या ‘अंबेचा गोंधळ’ला सांघिक स्वरुपात (तृतीय) रितोषिक मिळाले. ज्योती इंगोले, समिता टिल्लू, डॉ. शुभांगी म्हेत्रे, अलका बेल्हेकर यांनी परिक्षण केले. वाढदिवस असलेल्या सदस्यांचा सत्कार केला. कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तन्मय मोडक याचा विशेष सत्कार केला. उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले.