बाळासाहेबांच्या शिवसेनेत 
प्रकाश मलशेट्टी यांचा प्रवेश

बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रकाश मलशेट्टी यांचा प्रवेश

Published on

पिंपरी, ता. २ : माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप कुसाळकर यांच्यासह काळेवाडी, रहाटणी परिसरातील शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे स्वागत केले.
खासदार बारणे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन आणि जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्या प्रयत्नातून काळेवाडी, रहाटणी परिसरातील १०० पेक्षा अधिक अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. प्रकाश मलशेट्टी यांनी काळेवाडी परिसराचे महापालिकेत नेतृत्व केले आहे. यावेळी पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, शहर संघटक रवींद्र ब्रम्हे, समन्वयक हेमचंद्र जावळे, ॲड. प्रवीणकुमार गायकवाड, उपशहर प्रमुख अंकुश कोळेकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

‘‘आता माजी नगरसेवकही पक्षात येऊ लागले आहेत. पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रेरित होऊन कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आणि भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संघटन मजबूत होत आहे. त्याचा आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच फायदा होईल.
- श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार, बाळासाहेबांची शिवसेना

फोटो ः 15688

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com