विज्ञान व्याख्यान मालेची पिंपरीत सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान व्याख्यान मालेची पिंपरीत सांगता
विज्ञान व्याख्यान मालेची पिंपरीत सांगता

विज्ञान व्याख्यान मालेची पिंपरीत सांगता

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान व्याख्यान मालेच्या १६ व्या पुष्पामध्ये १ जानेवारी २०२३ अपसायकलिंगव्दारे संसाधनाचे जतन व संवर्धन या विषयावर ज्येष्ठ पर्यावरण अभियंता राजेंद्र कुमार सराफ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
टाकाऊ वस्तु मूल्यवर्धित उत्पादनामध्ये रुपांतरीत होतात व त्यामुळे, संसाधनांची बचत होते. अपसायकलींग हा भारतीय संस्कृतीचा सुद्धा एक भाग आहे, असे मत सराफ यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, सायन्स पार्क संगीत संध्या कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता झाला. त्या कार्यक्रमात चिंचवड येथील माधुरी कोळपे यांच्या विद्यार्थ्यांनींनी विविध गायन प्रकार सादर केले. सुरवातीला ऋतुराज कोळपे याने राग नारायणीमध्ये दोन बंदिशी सादर केल्या. साक्षी मंगरकर हिने नाम गाऊ हे भजन सादर केले. स्वरदा रामतीर्थकर हिने झुला सादर केला.
शेवटी, ऋतुराज व साई यांनी भैरवीमध्ये बंदिश गाऊन कार्यक्रमाची सांगता केली. या सर्व कलाकारांना तबला साथ योगेश लडकत आणि हार्मोनिअम साथ प्रिया धारपुरे यांनी केली. कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क संस्थेचे संचालक तथा सहशहर अभियंता प्रवीण तुपे उपस्थित होते. त्यांनी कलाकारांचे कौतुक केले. आभार सुरेखा कुलकर्णी यांनी मानले.