पिंपरी आमदार जगताप

पिंपरी आमदार जगताप

Published on

आमदार लक्ष्मण जगताप यांची कारकीर्द
१९६३ ः जन्म, १५ फेब्रुवारी
१९८६ ः कॉंग्रेसकडून नगरसेवक
१९९२ ः कॉंग्रेसकडून पुन्हा नगरसेवक
१९९३-९४ ः स्थायी समिती अध्यक्ष
१९९७ ः कॉंग्रेसकडून पुन्हा नगरसेवक
१९९९ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
१९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ ः महापौर
२००२ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेवक
२००३ ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष
२००४ ः विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय
२००४ ते २००८ ः विधान परिषद सदस्य
२००९ ः चिंचवड विधानसभा निवडणुकीत विजय (राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न)
२०१२ ः महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकली
२०१४ ः शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवली, पण पराभव
२०१४ ः भारतीय जनता पक्षात प्रवेश
२०१४ ः चिंचवड विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय
२०१६ ते २०१९ ः भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष
२०१७ ः भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या साथीने महापालिका निवडणूक लढवून भाजपचा महापालिकेत विजय
२०१७ ः भाजपचे १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आले. पाच अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा.
२०१८ ः देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा
२०१९ ः चिंचवड विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांची विजयाची हॅटट्रिक
२०२२ ः राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीसाठी रुग्णवाहिकेतून मुंबईला जाऊन मतदान
-------

मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

तडफदार नेतृत्व काळाने हिरावले : मुख्यमंत्री
‘‘नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. जगताप यांना पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरिरीने काम करीत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. त्यांचे अकस्मात जाणे हे त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबीयांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना : उपमुख्यमंत्री फडणवीस
‘‘लक्ष्मण जगताप यांचे निधन आमच्या पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची आजाराशी झुंज सुरू होती. ते यातून बाहेर येतील असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. मी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगताप यांना आदरांजली वाहिली.

पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा वस्तुपाठ : पाटील
“पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचे निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा जगताप वस्तुपाठ होते. बरे होतील असे वाटतानाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत,” अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com