Mon, Jan 30, 2023

‘एमआयडीसी’लाही फटका
‘एमआयडीसी’लाही फटका
Published on : 4 January 2023, 4:14 am
पिंपरी, ता. ४ : महावितरण संपाचा फटका पिंपरी चिंचवड औद्योगिक (एमआयडीसी) भागातील हजारो कंपन्यांना बुधवारी (ता. ४) बसला. भोसरी एमआयडीसी सेक्टर क्रमांक ७ व टी ब्लॉकमध्ये सकाळी ८. १५ ते १२.१५ या वेळेत वीज गेल्याने कंपन्यांचे काम ठप्प झाले. कामगारांना चार तास बसून राहावे लागल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. तळवडे, चिखली-कुदळवाडी या भागातही दिवसभरात अनेक वेळा वीज गेली.
वीजपुरवठ्याअभावी अनेक उद्योग आज बंद होते. त्याचा उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
कोट
-------
दिवसातून चार तास वीज गेली. एवढा वेळ कामगारांना बसून राहावे लागले. त्यामुळे उत्पादनात घट झाली.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.