चार लाख लाभार्थ्यांना मोफत धान्यांपासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार लाख लाभार्थ्यांना मोफत धान्यांपासून वंचित
चार लाख लाभार्थ्यांना मोफत धान्यांपासून वंचित

चार लाख लाभार्थ्यांना मोफत धान्यांपासून वंचित

sakal_logo
By

साडेतीन लाख लाभार्थी
मोफत धान्यापासून वंचित

सरकार दरबारी नोंद नसलेल्यांना फटका; आता एक लाख वीस हजारांनाच मिळणार लाभ

पिंपरी, ता. ५ ः प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजना एक जानेवारीपासून केंद्र सरकारने बंद केली आहे. परिणामी, सरकार दरबारी नोंद नसलेल्या सुमारे साडेतीन लाख लाभार्थ्यांना मोफत धान्यापासून वंचित केले आहे. नव्‍या नियमांनुसार निव्वळ एक लाख २० हजार लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजना
- कोरोना काळात कोणावरही उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकारकडून मोफत धान्याचे वाटप
- स्वस्त धान्याबरोबर दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ वितरित
- काही लाभार्थींना आठ रुपये गहू आणि बारा रुपये किलोने तांदूळ वितरित
- या योजनेमुळे गरिबांच्या घरी शिजत होते अन्न

बंद केल्याने परिणाम
- सरकारने सरसकट धान्य देणे बंद केल्यामुळे लाखो लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ
- राष्ट्रीय अंत्योदय योजना व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे मोफत धान्य मिळणार
- शहरात साडेचार लाख शिधापत्रिकाधारक असून, त्यांच्यापैकी आॅनलाइन असलेल्या एक लाख २० हजार जणांना मिळणार लाभ

आनंदाचा शिधा हिरावला
गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारकडून दिवाळीमध्ये रेशन दुकानातून चार वस्तू लाभार्थ्यांना शंभर रुपयांत देण्यात आल्या. दिवाळीमध्ये रेशन दुकानांतून देण्यात आलेले ‘कीट’ मिळण्यास उशीर झाला. त्यानंतर नवीन वर्षात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र शासनाने बंद केली. त्यामुळे स्वस्त दरात मिळणारे गहू आणि तांदूळ वितरित करता येणार नाहीत. त्याऐवजी लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मोफत देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी काय करावे
- डिसेंबर महिन्यातील धान्य घेऊ न शकलेल्या लाभार्थ्यांना धान्य मोफत देण्यात येणार
- रेशन दुकानदारांनी अशा लाभार्थ्यांची नोंद करावी. त्यांना जानेवारीत धान्य देण्यात येणार
- शहरातील स्वस्त रास्त दुकानदारांनी आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक ई-पॉस मशिनमध्ये नोंदणीकृत करून घ्यावेत
- नोंदणीकृत मोबाईलवर शिधापत्रिकाधारकांना त्यांचे युनिटनुसार किती धान्य मिळणार याचा मोबाईलवर मेसेज येणार

ठसे ‘स्कॅन’ न झाल्यास ‘ओटीपी’ पर्याय निवडा
काही लाभार्थ्यांच्या वयोमानानुसार बोटांचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नाहीत. कुष्ठरोगी, वयोवृद्ध विकलांग यांचे अंगठे ई-पॉस मशिनवर उमटत नाहीत. अशा लाभार्थ्यांनी त्यांचे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी येणार आहे. व तो ओटीपी क्रमांक त्यांनी रास्तभाव दुकानदारांना देऊन त्यांचे धान्य प्राप्त करून घेऊ शकणार आहेत.

‘‘ऑनलाइन असलेल्या लाभार्थ्यांना धान्य मिळणार आहे. पण मध्यमवर्गीय अनेक कुटुंब रेशनिंगवर अवलंबून आहेत. अनेक जण रस्त्यावर राहत आहेत. अशांना पण पोट आहे, याचा विचार सरकारने केला पाहिजे. ज्यांना मिळतेय, त्यांच्याबद्दल रोष नाही. पण आमचाही विचार करणे आवश्‍यक आहे. आम्हाला फुकट न देता अल्प दरात धान्य देण्याची सोय केली पाहिजे. सध्या बाजारात ३६ रुपये गहू विकत मिळतोय. पण तेच रेशनिंग दुकानात १५ रूपयांत तांदूळ तर १२ रूपयांत गहू सरकारने देण्याची सोय करावी.’’
- लता शिरसाट, लाभार्थी

‘‘सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सरकारकडून ज्या सूचना आल्‍या आहेत. त्यानुसार लाभार्थी आणि
दुकानदारांनी नोंद करावी.’’
- दिनेश तावरे, अन्नपुरवठा अधिकारी अ परिमंडळ