Sat, Jan 28, 2023

अवती भवती
अवती भवती
Published on : 6 January 2023, 9:54 am
अश्विनी पानसरे- भोर यांचा
डॉक्टरेट पदवीने सन्मानित
पिंपरी, ता. ६ ः इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल इंटर्नशिप युनिव्हर्सिटी ग्लोबल यांच्यातर्फे आयोजित ग्लोबल एज्युकेटर्स सिंपोजियम २०२२ मध्ये अश्विनी पानसरे- भोर यांना ‘आयआययू’चे ट्रस्टी डॉ. रोशनी लाल आणि विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पियुष पंडित यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. ‘ग्लोबल प्रिन्सिपल अवॉर्ड’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ''शिक्षणशास्त्र'' या विषयातून त्यांनी संशोधन करून ‘नेतृत्व शैलीचा प्रभाव शिक्षकांसाठी प्रेरणादायी कसा ठरू शकतो.’ या विषयावर रिसर्च पेपर प्रस्थापित केला. सध्या डॉ. अश्विनी पानसरे वाकडमधील बालसेवा इंग्लिश मीडियम स्कूलच्या (सीबीएससी) प्राचार्या
आहेत.
फोटोः 15587