सुमारे दीडशे उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी रजेवर प्रचारार्थ शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुमारे दीडशे उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी रजेवर
प्रचारार्थ शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वाऱ्यावर
सुमारे दीडशे उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी रजेवर प्रचारार्थ शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वाऱ्यावर

सुमारे दीडशे उमेदवार, कार्यकर्ते प्रचारासाठी रजेवर प्रचारार्थ शिक्षक सुट्टीवर, विद्यार्थी वाऱ्यावर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ८ ः पतसंस्था निवडणूक प्रचारासाठी महापालिकेतील तब्बल १५० शिक्षक उमेदवार व कार्यकर्ते रजेवर गेले आहेत. शिवाय ते शाळाशाळांमध्ये जाऊन थेट प्रचार करू लागले आहेत. यामुळे शिक्षणातील केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी वाऱ्यावर अशी स्थिती झाली आहे.

महापालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक १३ जानेवारीला आहे. जागा १७ आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद आणि महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा पुरस्कृत अशा तीन संघटना निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. ‘शिक्षक समृद्धी पॅनेल’, ‘मोरया पॅनेल’ आणि ‘श्री स्‍वामी समर्थ पॅनेल’ अशी तीन पॅनेल आहेत. प्रचार शिगेला पोचला आहे. प्रचारासाठी उमेदवारांनी रजा घेतल्या आहेत.

शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्‍याची ओरड कायम आहे. त्यात निवडणूकीसाठी तब्बल ५१ उमेदवार रजेवर गेल्यामुळे अध्यापनासाठीची संख्या आणखी कमी झाली आहे. उमेदवारांसोबत त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्ते शिक्षकांनी रजा टाकली आहे. दोन प्रभारी पर्यवेक्षकांचाही यात समावेश आहे. रजेवर गेलेली ही मंडळी कधी एकत्रित, कधी वैयक्तिक पातळीवर शाळाशाळांमध्ये जाऊन तास-दीड तास प्रचारासाठी जातात. त्यामुळे शिक्षकांना वर्ग सोडून भाषणे ऐकत थांबावे लागते. दबावामुळे मुख्याध्यापकांकडून परवानगी दिली जाते.


कोट
‘‘शिक्षक पतसंस्था निवडणूकीसाठी इतक्या शिक्षकांना सुट्टी कोणी मंजूर केली आहे. याविषयी माहिती घेऊन सांगतो. दुसरे म्हणजे या उमेदवारांनी शाळेचे नियम मोडून आणि वर्गात अडथळा आणू नये अशा सूचना मी देत आहे.’’
-संदीप खोत, शिक्षण उपायुक्त, महापालिका