‘स्पाईन रोड’ची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पाईन रोड’ची प्रलंबित कामे 
तात्काळ मार्गी लावा
‘स्पाईन रोड’ची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा

‘स्पाईन रोड’ची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० ः निगडी-भोसरी स्पाइन रोडचे प्रलंबित काम मार्गी लावून त्रिवेणीनगर परिसरातील वाहतूक सुरळित करावी. त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना केली आहे.
आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळवडे येथून आयटी आणि औद्योगिक पट्ट्यातून येणारी वाहने त्रिवेणीनगर भागातून स्पाइन रोडने जातात. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ही समस्या रस्त्यासाठी जागा देणाऱ्या बाधितांचा प्रश्न मार्गी लागल्यास सुटणार आहे. मात्र, त्यासाठी बाधित रहिवाशांचे रखडलेले पुनर्वसन आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या रस्त्यामुळे १३२ कुटुंब बाधित झाले आहेत. त्यापैकी ३९ बाधितांना भूखंड वाटप केले आहेत. उर्वरित बाधितांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. त्यांच्या पुर्नवसनासाठी वाढीव भूखंड देण्याची मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर अद्याप कार्यवाही झालेली नाही. रस्ता बाधितांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने प्राधिकरणाला सुमारे २३ कोटी रुपये दिले आहेत. ३९ बाधितांचे पर्यायी जागेचे करार केले आहेत. उर्वरित करार अद्याप बाकी आहेत. त्यांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ कार्यवाही करावी.