
आरटीओकडून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
पिंपरी, ता. ११ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने ३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत पिंपरी-चिंचवड स्कूल असोसिएशनच्या मदतीने भक्ती-शक्ती चौक ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व ट्रॅफिकपार्क येथे जनजागरण फेरी काढून सांगता करण्यात आली. फेरीत साधारणपणे ७० ते ७५ वाहनांना रस्ता सुरक्षा जनजागृती संदर्भात बॅनर्स लावून इंटरसेप्टर वाहनातून नागरिकांचे प्रबोधन केले.
चाचणीसाठी आलेल्या तसेच, फेरीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी प्रबोधन केले. तसेच, रस्ता सुरक्षितता व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांनी शपथ दिली. परिवहन वाहनांची अनुज्ञप्ती चाचणीसाठी उपस्थित सर्व उमेदवार यांना रस्ता सुरक्षिततेसंदर्भात अभिजित वसागडे व इतर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक मयूर भोसेकर, प्रकाश मुळे, बालाजी धनवे, सुनील क्षीरसागर व इतर अधिकारी यांच्या मदतीने रस्ता सुरक्षेचे बॅनर्स लावले. विंदा गुरावे, सोनाली पोतदार, अंजली पाथरे, आदित्य जाधव, अरविंद कुंभार आणि सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी फेरीबाबत उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड, गीतांजली काळे, पिंपरी-चिंचवड स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील बर्गे, दत्ता घाडगे, अकबर शेख, अप्पा चव्हाण, नाना शिंदे व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.