
सिटीझन जर्नालिस्ट बातम्या
पदपथ शोधून द्या
भोसरीमध्ये लांडेवाडी चौक ते चांदणी चौक राजमाता जिजाऊ उड्डाणपूल येथे पदपथ शोधून सापडणार नाही. व्यावसायिकांकडून येथे अनधिकृतपणे पदपथ वापरला जात आहे. नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. वाहने कशीही पार्क केली जात आहेत. तरी, महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही. रस्त्याचे काम गेले कित्येक महिने चालू आहे. तरी, कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. जेणेकरून नागरिकांना सुरक्षित चालता येईल.
- एक वाचक
--
मेलेले डुक्कर उचला
कृष्णछाया बिल्डींगसमोर ओम फिटनेस जिमच्या बाजूच्या गटारात डुक्कर मरून पडले आहे. अद्यापपर्यंत महापालिकेकडून कोणीही या ठिकाणी आलेले नाही. या ठिकाणी कोणीही कर्मचारी फिरकले नसल्याने जवळपासचे नागरिक आणि भोंडे शाळेतील लहान-लहान विद्यार्थी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
लवकरात लवकर यावर कार्यवाही व्हावी.
- एक वाचक
--
चुकीचा बांधलेला चौथरा हटवा
यशवंतनगर चौक, टेल्को रोडजवळ चुकीच्या पद्धतीने चौथरा बांधलेला आहे. चिंचवडकडून जाणाऱ्या वाहनांना भोसरीकडून आलेली वाहने दिसत नाहीत. त्यामुळे, भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हा चौथरा हटविण्यात यावा अन्यथा दुरुस्त करण्यात यावा. संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष द्यावे.
- दीपक दातीर पाटील, चिंचवड
--
फोटो ः 17747