मकर संक्रांतीला काळ्या साड्यांची क्रेझ 
पाचशे ते दहा हजार रुपये किमतीच्या साड्या बाजारात उपलब्ध

मकर संक्रांतीला काळ्या साड्यांची क्रेझ पाचशे ते दहा हजार रुपये किमतीच्या साड्या बाजारात उपलब्ध

पिंपरी, ता. १२ ः मकर संक्रांतीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. महिलांनी तयारी सुरूही केली आहे. एरवी काळ्या साड्यांमध्ये खूप काही प्रकार उपलब्ध नसतात पण संक्रांतीनिमित्त काळ्या साड्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांची व्हरायटीदेखील उपलब्ध आहे.

सण उत्सवाला आपल्या संस्कृतीत काळा रंग काही ठिकाणी चालत नाही. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे काही भागात वर्ज्य आहे. मात्र, मकरसंक्रांतीला काळ्या रंगानं शुभ - अशुभच्या कल्पना मोडीस काढल्या आहेत. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे. म्हणूनच मकरसंक्रांती सण असो वा घरगुती कार्यक्रम, ऑफिस पार्टी यांना आवर्जून काळा रंग असलेल्या साड्या आणि ड्रेसला प्राधान्य दिले जाते आहे. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे झबले, फ्रॉक व हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणून विशेषत: काळ्या साड्यांची मागणी वाढली आहे. निकेश तकावणे यांनी सांगितले, की बाजारात सॉफ्ट सिल्क, माहेश्वरी सिल्क, सिल्क पैठणी, कॉटन साड्या उपलब्ध आहेत. ५०० ते अगदी १०,००० किमतीच्या रेंजमध्ये काळ्या साड्या उपलब्ध आहेत. ’’

नवविवाहित मालती साळुंखे म्हणाल्या, ‘‘मकर संक्रांत आणि काळा रंग म्हणजे चेरी ऑन द केक आहे आणि खुलून दिसणारा रंग आहे. मी कॉटन प्रकारातली काळी साडी घेतली आहे. ‘पार्टीवेअर लूक ’असणारी ही साडी ३४१ रुपयांना घेतली आहे. साडीचे काठ मोठे आणि सुंदर असल्याने एखाद्या छोटेखानी समारंभासाठीही आहे.’’

निर्मला सिंग म्हणाल्या, ‘‘संक्रांत सणाला अनेकजणी कांजीवरम ब्रोकेड किंवा शिफॉन साडी घेतली आहे. अवघ्या ४०० रुपयाला मिळाली आहे. साडीचा लूक वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल बनला आहे.’’


कोट
मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात. त्यामुळे आम्ही दरवर्षी काळ्या रंगाच्या साड्यांचे कलेक्शन असते. महिला ग्राहकांची सिल्क पैठणीला पसंती आहे. दररोज कमीत कमी ५० काळ्या साड्यांची विक्री होत आहे. आमच्या दुकानातून आठ दिवसात एक हजार साड्यांची विक्री झाली आहे. ’’
-संचिता भोसले, साडी विक्रेत्या, चिंचवड
17767, 17769

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com