‘रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल’ देशातील पहिला प्रकल्प - शेखर सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh
‘रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल’, देशातील पहिला प्रकल्प

Pimpri Chinchwad : ‘रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल’ देशातील पहिला प्रकल्प - शेखर सिंह

पिंपरी - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत ‘रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल’ हा प्रकल्प राबविला आहे. तो देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविलेला पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी योजना घोषित केली होती. तिच्या तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवड शहराची निवड झाली होती. त्यानुसार १३ जुलै २०१७ रोजी ‘पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड’ कंपनीची स्थापना झाली. पिंपळे सौदागरसह पिंपळे निलख, वाकड, रहाटणी या भागांचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला. तेथील कामकाजासाठी केंद्र व राज्य सरकारसह महापालिकेकडून निधी उपलब्ध होत आहे. त्यातील ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा एक प्रकल्प आहे.

ऑप्टिकल फायबर नेटवर्क

ऑप्टिकल फायबर नेटवर्क हा स्मार्ट सिटीच्या पायाभूत सुविधांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. स्मार्ट सिटी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी आणि अद्ययावत व योग्य कृतीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट सिटी फायबर ऑप्टिकल नेटवर्क सिस्टीमची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

अशा आहेत सुविधा

नागरिकांच्या सुरक्षा व सुविधेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सिटी वायफाय, स्मार्ट किओक्स आणि डिस्प्ले बोर्ड, स्मार्ट ट्रॅफिक, स्मार्ट पार्किंग उभारले आहे. सिटी नेटवर्कच्या माध्यमातून कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरला जोडले आहे. त्यासाठी एकूण ६०० किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क उभारले आहे. त्याद्वारे भविष्यात उत्पन्न मिळणार आहे.

रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल

‘रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल’ जाणून घेण्यासाठी १५ मार्च २०२१ रोजी विविध कंपन्यांकडून कल्पना मागवल्या. सिटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून मॉडेल्सची चाचपणी केली. भारत संचार निगम, भारत ब्रॉडकॉस्च निगम, डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल तयार केले.