Mon, Feb 6, 2023

आज सर्वपक्षीय शोकसभा
आज सर्वपक्षीय शोकसभा
Published on : 13 January 2023, 1:18 am
पिंपरी, ता. १३ : आमदार लक्ष्मण जगताप यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी (ता. १४) सायंकाळी सहा वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड आदी उपस्थित राहणार आहेत.