
इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृत शाळांची यादी जाहीर
पिंपरी, ता.१४ ः महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील पाच अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी केले आहे.
शासनाची कोणतीही परवानगी न घेता त्या चालविण्यात येत होत्या. त्या बंद करण्यासाठी शिक्षण संस्थांना दरवर्षी नोटीसही बजावल्या गेल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पर्यवेक्षकांना दिले आहेत. अनधिकृत शाळांची एकूण संख्या अकरा होती, त्यापैकी यंदा सहा शाळा बंद केल्या आहेत. उर्वरित आठ शाळांना २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
अनधिकृत शाळा
१ ज्ञानराज प्राथमिक शाळा, कासारवाडी
२ मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी
३ माने इंग्लिश स्कूल, राजवाडेनगर, काळेवाडी
४ काकाज इंटरनॅशनल स्कूल, काळेवाडी
५ होली मिशन इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी
सीबीएसई बोगस शाळांचा शोध
पुणे शहरात सीबीएसई बोर्डाच्या तीन शाळा बोगस आढळल्या. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शिक्षण विभागातर्फे शहरातील सीबीएसईच्या बोगस शाळांची शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरात एकूण ४६ आहेत. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र आणि संलग्न प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. अहवालाच्या छाननीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर किती बोगस शाळा आहेत हे कळेल, असे नाईकडे यांनी सांगितले.