Wed, Feb 1, 2023

संस्कार जत्रेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात
संस्कार जत्रेचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात
Published on : 14 January 2023, 2:17 am
पिंपरी, ता. १४ : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने बिजलीनगर येथील श्री विश्वेश्वर मंदिराच्या पटांगणात संस्कार जत्रा उत्साहात झाली. जत्रेत ३५ शाळांचे २६५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला, भगवद्गीता पाठांतर, वकृत्व, रांगोळी, मॕथमस्ती, समूहगीत, समूहनृत्य, सुंदर हस्ताक्षर, वेशभूषा, वैयक्तिक नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग व बक्षीस पात्र शाळा म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय, आकुर्डी या शाळेला मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित केले. २६ बक्षीसे या शाळेने पटकाविली. जत्रेत अभिनेत्री मोहिनी कुडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे संयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी केले.