‘शब्दधून’ कवितासंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शब्दधून’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
‘शब्दधून’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

‘शब्दधून’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः कवी सूर्यकांत भोसले लिखित ‘शब्दधून’ कवितासंग्रहाचे प्रकाशन माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर अध्यक्षस्थानी होते. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, प्रकाशक नितीन हिरवे प्रमुख पाहुणे होते. उपस्थिती होती. या वेळी ज्येष्ठ कवी मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यात बंडा जोशी, अनिल दीक्षित, सीताराम नरके, सीमा गांधी, अनंत गोगले, आनंद गायकवाड, संकेत खांडगे, पल्लवी येवले, अरुण कांबळे, अशोक भांबुरे, राहुल भोसले, आशा शिंदे, उद्धव महाजन, रमेश पिंजरकर, राजेंद्र चौधरी, नितीन शिंदे, मकरंद घाणेकर, जगदीप वनशीव यांनी कविता सादर केल्या. प्रा. विजय लोंढे व योगिता पाखले यांनी सूत्रसंचालन केले.