Fri, Feb 3, 2023

प्राधिकरणात उभारणार
जगताप यांचा पुतळा
प्राधिकरणात उभारणार जगताप यांचा पुतळा
Published on : 17 January 2023, 2:03 am
पिंपरी, ता. १७ ः राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक शहरामध्ये व्हावे, अशी मागणी तीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होती. त्या मागणीच्या पूर्ततेसाठी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेकडून त्यावेळी पाच कोटी रुपयांचा निधी यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस मिळवून दिला होता. आता आमदार जगताप यांचे निधन झाले आहे. त्यामुळे निगडी- प्राधिकरणातील सेक्टर २७ मधील स्मारक समितीच्या आवारामध्ये त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा निर्णय समितीतर्फे आयोजित शोकसभेत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष सुनील जाधव यांनी दिली आहे.