तळेगावात आजपासून श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेस आरंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात आजपासून  श्री तुकाराम महाराज 
लोकसंवाद व्याख्यानमालेस आरंभ
तळेगावात आजपासून श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेस आरंभ

तळेगावात आजपासून श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेस आरंभ

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता.१८ : तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे कै. कल्याणराव ऊर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्‍गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे येत्या १९ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे प्रांगण, नाना भालेकर कॉलनी, येथे सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे निमंत्रक ट्रस्टचे संस्थापक डॉ. कृष्णकांत वाढोकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष नगरसेवक निखिल भगत, डॉ. वर्षा वाढोकर यांनी दिली.
या व्याख्यानमालेमध्ये १९ जानेवारीला सिनेनाट्य अभिनेते मिलिंद शिंदे यांचे ‘माझा कला प्रवास’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्ष कलापिनीचे विश्वस्त अनंत परांजपे असणार आहे. तर मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, गणेश काकडे, विलास काळोखे उपस्थित राहणार आहेत.      
            २० जानेवारीला सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांचे ‘भारतीय एकात्मता’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षा डॉ.सुचित्रा कराड नागरे, असून निरुपा कानिटकर एस. के. असोसिएट्सच्या संचालिका सीमा कांचन कदम, शैलजा काळोखे उपस्थित राहणार आहेत. २१ जानेवारीला सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांचे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्मरण बलिदानाचे’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी मदन बाफना असतील. विशाल जाधव ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, पं. सुरेश साखवळकर, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत भिडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी ६.०० वाजता शांता कल्याणराव जाधव-धोत्रे यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेचे उद्‍घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होणार आहे,