ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे 
स्नेहसंमेलन उत्साहात
ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १९ : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळचे ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माऊली दाभाडे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नू.म.वि.प्र. मंडळाचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थेचे संचालक दामोदर शिंदे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘नंदादीप’ हस्तलिखिताचे प्रकाशन संतोष खांडगे यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी आभार मानले. अनिता नागपुरे व रजनी बधाले यांनी सूत्रसंचालन केले. शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार व मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी मार्गदर्शन केले.

PNE23T19327