वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार‎ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार‎
वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार‎

वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याने नागरिक बेजार‎

sakal_logo
By

पिंपरी, ता.१९ ः मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, घसा दुखीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बाह्य रूग्ण तपासणी कक्षात दररोज सतराशे रूग्ण येत आहेत. सर्दी-खोकला आठवडाभर बरा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळी अकरानंतर उन्हाच्या झळा, रात्री साडेसात नंतर सकाळी नऊपर्यंत गारठा असतो. या बदलामुळे नागरिक आजारी पडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने वातावरण दमट आहे. यामुळे धुळीचा‎ संसर्ग असलेल्यांना सर्दी,‎ खोकल्याचा त्रास व घशात सतत‎ खवखव होत आहे. याचा सर्वाधिक त्रास दमा असलेल्यांना होत आहे.

मळमळ, उलटीचेही रुग्ण‎
महापालिका रुग्णालयातील मेडिसीन २७१ रूग्ण आणि बाल रुग्ण विभागात‎ ५६ रुग्ण दाखल‎ आहेत. यामध्ये सर्वाधिक ताप,‎ सर्दी, खोकला, मळमळ, जुलाब,‎ उलटीच्या रुग्णांचा समावेश आहे.‎ आणखी काही दिवस‎ वातावरण असेच राहिल्यास‎ रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता‎ वर्तविण्यात येत आहे.‎

कोट
‘‘थंडीचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने सर्दी व‎ खोकल्याच्या रुग्णांची संख्या ओपीडीला वाढत आहे. नियमित रुग्णांच्या निदाना नंतरच आजार समजू शकतो. सध्या रुग्णालयात सर्व औषधे उपलब्ध‎ आहेत.’’
-डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय