ब्रिजभूषण सिंग यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिजभूषण सिंग यांचा निषेध
ब्रिजभूषण सिंग यांचा निषेध

ब्रिजभूषण सिंग यांचा निषेध

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये जंतर-मंतर मार्गावर धरणे आंदोलन सुरु केले आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील आरोप हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, त्यामुळे संपूर्ण क्रीडा विश्वाची व संपूर्ण देशाची मान खाली गेली आहे. त्यामुळे, नागरी हक्क सुरक्षा समितीच्यावतीने त्यांचा धिक्कार करत असून, महिला कुस्तीगीर खेळाडूंना पाठिंबा देत आहोत.
नागरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले, ‘‘मागील अनेक दिवसांपासून क्रीडा क्षेत्रातील प्रशासकीय पदाधिकारी आणि प्रशिक्षकांवर खेळाडूंकडून असे आरोप वारंवार केले जात आहेत. परंतु खेळातील राजकारणामुळे व आर्थिक हितसंबंधांमुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. महिला पहिलवान विनिषा फोगाट यांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक महिला व पुरुष पहिलवानांनी सहभाग घेतला आहे. या सर्व खेळाडूंनी जागतिक पातळीवर पदके जिंकून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा सन्मान वाढवलेला आहे. अशा खेळाडूंनी मागणी करूनही देशाचे क्रीडा मंत्रालय जर, दोषी व्यक्तीवर कारवाई करत नसेल तर ते अतिशय लांच्छनास्पद आहे.’’